वीस दिवसांपुर्वी विषप्राशनाचा प्रयत्न, सोमवारी सीपीआरमध्ये झाली दाखल
प्रतिनिधी / कोल्हापूर
सांगली जिल्हय़ातील नेर्ले (ता. वाळवा) येथील तरूण सोमवारी सीपीआरमध्ये उपचारार्थ दाखल झाला. मंगळवारी सकाळी त्याचा कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू असता मृत्यू झाला. त्याचा स्वॅब घेतला असून अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान मृताची हिस्ट्री पाहता तिने 20 दिवसांपुर्वी विषप्राशनाचा प्रयत्न केला होता, त्याची नोंद पोलिसांत असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने मंगळवारी दिली.
नेर्ले येथील तरूणाला अशक्तपणामुळे सोमवारी सीपीआरमधील कोरोना आयसोलेटेड वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्याला दिवसभर तापही आला होता. मंगळवारी सकाळी सव्वाअकरा वाजता उपचार सुरू असता तिचा मृत्यू झाला. कोरोना संशयित मृत्यू म्हणून त्याची नोंद झाली आहे. मृताचा स्वॅब घेतला असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. त्याच्यातील लक्षणांची हिस्ट्री पाहता विषप्राशनाची शक्यता आहे. दरम्यान, 20 दिवसांपुर्वी त्याने विषप्राशनाचा प्रयत्न केला होता, त्याच्यावर इस्लामपूर येथील खासगी रूग्णालयात 20 दिवस उपचार सुरू होते, याची नोंद पोलिसांत झाली होती, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली.
इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाला रात्री उशिरा सीपीआरमधील स्पेशल वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. सोमवारी पाठवलेल्या स्वॅबपैकी 41 जणांचे स्वॅब रिपोर्ट मंगळवारी सकाळी निगेटिव्ह आल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.