प्रतिनिधी / सांगली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील “बेस्ट’ च्या प्रवासी सेवेसाठी सांगली विभागातून 425 जणांची पहिली तुकडी 10 ऑक्टोबरला गेली होती. ही पहिली तुकडी 23 ऑक्टोबरला परतली. त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये तब्बल 127 जण कोरोनाबाधित आढळले.
त्यामुळे दुसरी तुकडी परत बोलावण्यात आली. त्यामुळे सांगली आगारातील कर्मचारी व गाड्यांची सेवा 31 ऑक्टोबरपासून स्थगित केल्याचे जाहीर केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात परतलेल्या 400 जणांपैकी तीनशे जणांची कोरोना निदान चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 46 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगलीतील 40 जणांचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे. तसेच इस्लामपुरातील 48 जणांची तपासणीच झालेली नाही. त्यांना स्वतःच चाचणी करून घेण्यास अधिकार्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अजूनही शंभर जणांचा अहवाल प्रलंबित आहे. एसटीच्या पहिल्या तुकडीतील 127 आणि दुसऱ्या तुकडीतील आज अखेरचे 46 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. सुमारे 173 कर्मचारी बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगारनिहाय बाधित कर्मचारी- तासगाव 9, शिराळा 5, विटा 9, जत 8, मिरज 6, पलूस 1 व कवठेमहांकाळ 8 याप्रमाणे 46 जण बाधित असल्याचे आढळून आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








