कुपवाड / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्याचे विभागीय वनाधिकारी प्रमोद धानके यांची बुधवारी पदोन्नतीवर ठाणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या बदलीबाबतचा शासन आदेश नुकताच प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात आले.
प्रमोद धानके यांची ठाणे येथे सामाजिक वनीकरण विभागात वनसंरक्षक म्हणून पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. धानके यांनी सांगली जिल्ह्यात उल्लेखनीय काम केले आहे. वनस्पती जैवविविधतेवर त्यांनी माहितीपट तयार केला असून तो लवकरच प्रकाशीत करण्यात येणार आहे. सांगलीत शिरलेल्या बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवास मुक्त करण्याचे आव्हानही धानके यांनी सक्षमपणे पेलले होते. धानके हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे असून बीएसस्सी ऍग्री विषयात ते पदवीधर आहेत. १९८६ मध्ये महाराष्ट्र वन सेवेत ते दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तमिळनाडू येथे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी ढहाणू, गडचिरोली, भामरागड, वाशीम, नाशिक, जानला, नगर, सुरगाणा येथे काम केले. नाशिक येथे जागतिक ख्यातीचे वनस्पती शास्त्रज्ञ अलमेडा यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर वनस्पती जैवविविधतेचा माहितीपट तयार करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. दैनंदिन काम संभाळून इंच आणि इंच परिसरात शोध घेवून वनस्पतीची माहिती घेतली. त्याची माहितीपटही प्रकाशित केली.
सांगली जिल्ह्यात त्यांनी अडीच वर्षाहुन अधिक काळ काम केले. या कालावधीत त्यांनी वनस्पती जैवविधतेच्या माहितीपटासाठी विशेष काम केले. तसेच वनजीव नागरीवस्तीत आल्यानंतर त्यांना रेस्कू करण्यासाठी टास्क फोर्स तयार केला. तसेच रेस्कूसाठी लागणारी सर्व साधानसामुग्रीही त्यांनी जिल्ह्याला मिळवून दिली. कर्मचाऱ्यांना वन्यजीव रेस्कू करण्याचे अद्यावत प्रशिक्षण देण्यावर त्यांचा भर राहिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








