प्रतिनिधी / सांगली
मधुमेह म्हणजे कोणताही गंभीर आजार किंवा व्याधी नाही. त्यामुळे घाबरून न जाता योग्य दिशेने प्रयत्न केल्यास तो आटोक्यात येऊ शकतो. सांगलीत सुरू असलेले मधुमेह मुक्ती अभियान हे राज्यासाठी प्रेरक असल्याचे मत मधुमेह मुक्ती अभियानाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी व्यक्त केले.लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डायबिटीस रिव्हर्सल सेंटरतर्फे आयोजित डॉक्टरांच्या चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. सतीश परांजपे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना डॉ. दीक्षित म्हणाले, वैद्यकीय नियमानुसार कोणत्याही मधुमेह रुग्णाचे परीक्षण तीन महिन्यानंतर होते. मधुमेह झाल्याक्षणीच औषधे सुरू करणे रुग्णांसाठी घातक आहे. देशभरात सध्या सुमारे आठ कोटी लोकांना टाइप २ चा मधुमेह झाल्याची आकडेवारी आहे. मात्र त्या प्रमाणात तज्ञ डॉक्टरांची वानवा आहे. अभ्यास व संशोधनाअंती काही ठोकताळे निर्माण केले आहेत. त्याचे तंतोतंत पालन केल्यास मधुमेह नक्कीच आटोक्यात नव्हे तर व्याधीमुक्त होऊ शकतो. डॉक्टरांनी कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना धीर देऊन त्यांना विनामूल्य मार्गदर्शन करून मनातील भीती कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आयुर्वेदिक डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. विवेक वैद्य, जनरल प्रॅक्टिशनर्स फोरमचे डॉ. अरुण कोळी, होमिओपॅथी असोसिएशनचे डॉ. अभय देसाई, डॉ. मिलिंद किल्लेदार, डॉ. देवपाल बरगाले, नीता केळकर, संजय भिडे, शार्दुली तेरवाडकर, मेघना भिडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्रीरंग केळकर यांनी आभार मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








