प्रतिनिधी/सांगली
सांगली जिल्ह्यातील पद्माळे गावचे बासरी वादक रसूलभाई मुलाणी (वय ४९ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रसूलभाई यांच्या आकस्मिक निधनाने सांगली पंचक्रोशीतील संगीतप्रेमींना खूप मोठा धक्का बसला आहे.
पद्माळे सारख्या छोट्या गावात राहून बासरीवादनाची कला बालपणापासून जोपासून रसूलभाई यांनी त्यात प्राविण्य संपादित केले होते. ‘सप्तक ‘ अशोक रेळेकर निर्मीत सा रे ग म या हौशी संस्थेत ते गेले २० वर्षे बासरी वादक होते . बासरी वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेऊन त्यांनी बासरी विशारद ही पदवी संपादन केली होती. तसेच ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त वादक कलाकार होते. अनेक संगीत सभांमधून त्यांनी साथसंगत केली होती. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची अनेक गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली. ते भजन ही सुंदर गात असत.
त्यांचा शांत स्वभावाने ते सर्वाना हवेहवेसे वाटायचे. आज त्यांच्या जाण्याने मधुर बासरी मुकी झाली. रसूल भाई माऊथ ऑर्गन आणि शहनाई उत्तम वाजवत असत. मुस्लीम असूनही घरामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा होता. ते एकादशीला उपवास, आणि पंढरीची वारीही करत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








