सांगली / प्रतिनिधी
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोना महामारीने जनता भयभीत झाली होती. अशा कठिण समयी सुरेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुसज्ज असे भ. महावीर कोविड हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प सोडला. अवघ्या पंधरा दिवसांत समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करुन सुमारे ७५ लाखांची अत्याधुनिक साहित्य साधने जमविली आणि सांगलीकरांच्या सेवेसाठी भ. महावीर कोविड हॉस्पिटल सुरू करुन सहजासहजी रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते अशा अत्यंत अडचणीच्या काळात २७५ रुग्णांना कोरोना मुक्त करुन बहुमोल योगदान व जीवदान दिले होते.
यावर्षी पुन्हा कोरोना संसर्ग बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा सुरेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आणि राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्या सहकार्याने लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज लेडीज होस्टेल नेमिनाथ नगर राजमती भवनासमोर सांगलीच्या प्रांगणात भ. महावीर कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. भ. महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करुन हॉस्पिटल उभारणीच्या कामाचा संकल्प केला. या कामी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांचे सहकार्य मिळाले. हे हॉस्पिटल सुरू करण्यास प्रशासनाची मंजूरीही मिळाल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी ३० बेडसची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून त्यामध्ये १५ बेडस आयसीयू व्हेंटीलेटर युक्त व १५ अॉक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे . रुग्णांसाठी शुध्द शाकाहारी मोफत भोजन व्यवस्था, डॉ. पवन गायकवाड यांचेकडून रुग्णांचे मानसिक समुपदेशन व आरोग्य प्रबोधन उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच भ. महावीर कोविड हॉस्पिटल लवकरच सांगलीकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.
या कोविड हॉस्पिटलसाठी अनुभवी डॉक्टरांची टीम असणार आहे.. त्यामध्ये डॉ. वैशाली सोमनाथ कोरे, डॉ. नीरज, डॉ. दिनेश भबान,डॉ. राहुल पाटील, डॉ. प्रीतम आडसुळे, डॉ. बी. एस. पाटील, डॉ अमोल सकळे व डॉ. अमोल पाटील यांचा लाभ रुग्णांना होणार आहे. या सर्व डॉक्टरांनी हे काम आनंदाने स्वीकारले आहे.
या कोविड हॉस्पिटलचा संकल्प करताना संयोजक सुरेश पाटील, सुभाष बेदमुथा, जितेंद्र जैन नाणेशा, डॉ. दिनेश भबान, डॉ. राहुल पाटील, मनोज पाटील, अजित पाचोरे, वसंत पाटील, सुभाष देसाई, राजगोंडा पाटील, ए. बी. पाटील, आदिनाथ उपाध्ये, महावीर भंसाळी उपस्थित होते. भ.महावीरांचा” जगा व जगू द्या ” हा विचार साक्षात कृतीत उतरविणाऱ्या या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून अनेकांनी पुन्हा मदतीची तयारी दाखवली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









