प्रतिनिधी / सांगरूळ
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे सांगरुळ गावामधील अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडलेत तसेच वादळामुळे पडलेल्या झाडांच्या पडझडीमुळे वीज वाहक तारा ही तुटून संपूर्ण गावातील घरगुती व कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाला होता . दुपारी तीन वाजता सुरू झालेला वादळी पाऊस सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता .त्याच दिवशी पाच नंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गावातील घरगुती वीज प्रवाह सुरू करण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू केले .
कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी देशात व राज्यात लागू असलेल्या संचारबंदी आदेशाचे काटेकोर पालन करत महावितरणचे सांगरूळ कार्यालयाचे जूनियर इंजीनियर अमित नाकटे यांनी महावितरणचे कर्मचारी व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने त्याच दिवशी रात्री आठ वाजे पर्यंत बॅटरीच्या प्रकाशात काम करून गावातील विद्युत पुरवठा सुरू केला .व ग्रामस्थांना संचार बंदीच्या काळात वीज पुरवठा करून दिलासा दिला. रदार वादळाने वीजवाहक तारांवर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने शेतीला वीज पुरवठा करणाऱ्या लाइनचे विजेचे खांब मोडलेत वीज वाहक ताराही तुटल्या .यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला .
महावितरणने दुसऱ्याच दिवशी दोन कॉन्ट्रॅक्टदार बोलवून खांब उभारणी व विजेच्या तारा ओढण्याचे काम सुरू केले . महावितरणचे अभियंता अमित नाकटे यांनी कामाच्या ठिकाणी स्वतः हजर राहून एक आठवड्यात कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत सुरू केला .महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत बॅटरीच्या प्रकाशात काम करून गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी रात्री कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरु केला . महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेला सांगरुळ ग्रामपंचायत प्रशासन तसेच अनेक शेतकरी बांधवांनी व युवकानी उस्फूर्तपणे सहकार्य केले . देशामध्ये कोरोनाचे संकट असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शेती वीजपुरवठा सुरु करण्यासाठी परिश्रम घेतले. शेतकऱ्यांच्या ऊस व रब्बी पिकांच्या बरोबरच अंतर पिकांसाठी पाण्याची खूप गरज होती .ही पिके पाण्यावाचून वाळून जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत होती .पण पण महावितरणचे अभियंते अमित नाकटे व व सर्व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने मोलाचे योगदान देऊन दररोज अकरा तास काम करून कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे .