प्रतिनिधी / वाकरे
गणेश नाळवा ,सांगरूळ फाटा, कोपार्डे ( ता. करवीर) येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने कोपार्डे ग्रामपंचायतीने सांगरूळ फाटा परिसर चार दिवसांसाठी लॉकडाउन केला असून परिसरातील सर्व गॅरेज,दुकाने, हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरात शुकशुकाट जाणवत आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की गेल्या महिन्यापासून गणेश नाळवा,कोपार्डे येथे कल्याण ,मुंबई येथून एक कुटुंब राहण्यासाठी आले आहे. त्यापैकी एक व्यक्ती १५ दिवसांपूर्वी कल्याण, मुंबई येथे कामानिमित्त गेली होती. या व्यक्तीने कोल्हापुरात परत आल्यानंतर स्वतःचा स्वब तपासणीसाठी दिला होता. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने कोपार्डे ग्रामपंचायतीने सांगरूळ फाटा आणि कारखाना परीसर लॉकडाउन केला असून परिसरातील सर्व व्यवहार खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणा सुद्धा सतर्क झाली असून या व्यक्तीचा कुठे संपर्क आला आहे का याची माहिती घेत आहे.दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्याने कुंभी कासारी कासारी परिसरात खळबळ उडाली असून परिसरात याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या लॉकडाउन मुळे नेहमी गजबजलेला सांगरुळ फाटा चौक शांत असून पुन्हा सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
Previous Articleकोल्हापूर जिल्हय़ात ७ कोरोना पॉझिटिव्ह
Next Article कुरुंदवाड शहरात सापडले दोन कोरोना पॉझिटिव्ह









