पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धकांचा सहभाग ; प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद
सांगरुळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन व न्यू कोल्हापूर बॉडी बिल्डींग असोसिएशन यांच्या मान्यतेने श्री छत्रपती युवा प्रतिष्ठान सांगरूळ व दीपक खाडे जीम सांगरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने सांगरूळ (ता करवीर) येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धा २०२२ स्पर्धेत सातारचा फैय्याज शेख “छत्रपती श्री ” किताबाचा मानकरी ठरला . संयोजकांच्या वतीने त्याला सन्मानचिन्ह व रोख १११११ रुपये इनाम देऊन गौरविण्यात आले .बेस्ट इंपुव्हमेंट म्हणून अर्जुन मोगले यांची तर बेस्ट पोजर म्हणून ऋषिकेश वगरे यांची निवड करण्यात आली त्यांना सन्मानचिन्ह व रोख पंधराशे रुपये इनाम देऊन गौरवण्यात आले .
स्पर्धतील गटवार पहिले पाच विजेते पुढीलप्रमाणे आहेत
५०ते ६० वजन गट – अवधूत निगडे (कोल्हापूर) विनोद पोतदार (सांगरूळ) राहील मणेर (सातारा) प्रथमेश पवार (सातारा) तिलक दगडे (कोल्हापूर)
५५ ते ६० वजन गट – रामा मैनाक (सातारा ) केवल परमार (कोल्हापूर ) राकेश साळुंखे (सातारा ) अविनाश नाईक (कोल्हापूर ) आकाश साळुंखे (कोल्हापूर)
६० ते ६५ वजन गट – अर्जुन मोगले (कोल्हापूर ) जयसिंग नाईक (कोल्हापूर)राकेश कांबळे (सांगली ) विशाल पाटील (कोल्हापूर )रवी इंगवले (कोल्हापूर )
६५ ते ७० वजनगट – फैयाज शेख (सातारा ) ऋषिकेश वगरे (कोल्हापूर) अमित पाटील (कोल्हापूर) युवराज जाधव (कोल्हापूर ) अभिषेक निगडे (कोल्हापूर )
७० ते ७५ वजगट – प्रणव कांबळे (कोल्हापूर ) अमन कुट्टी (कोल्हापूर ) उमेश मोहरकर (सातारा) दिगंबर मालुसरे (सातारा )सतीश कोटकर (कोल्हापूर )
७५ ते ८० वजनगट – प्रशांत भोसले ( कोल्हापूर ) वैभव अस्वले (कोल्हापूर)ओमकार मुळे (सातारा) आशिष पाटील (कोल्हापूर) सोमनाथ जगदाळे (सातारा)
या स्पर्धेसाठी पंच म्हणून राजेश वडाम,संदिप यादव,दिपक माने,मुरली वत्स,सुर्यकांत माने,नितीन माने,विवेक संगपाळ, अमित कासट यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे उदघाटन रयत सहकारी संघाचे संचालक सचिन पाटील व उद्योजक संदिप शेलार यांच्या हस्ते व सरपंच सदाशिव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले .सर्व गटातील प्रथम पाच विजेत्यांना देणगीदारांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले .यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे ,कुंभीचे व्हा चेअरमन निवास वातकर सेवानिवृत्त अध्यापक के डी पाटील, दिपक खाडे जिमचे मार्गदर्शक पंडित खाडे यांचे सह श्री छत्रपती युवा प्रतिष्ठान सांगरूळचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ,दिपक खाडे जिमचे प्रशिक्षणार्थी स्पर्धेचे देणगीदार यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते .सूत्रसंचालन सुहास खाडे यांनी केले तर आभार दिपक खाडे यांनी मानले.