गावातील ज्येष्ट नाटय़ कलाकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
प्रतिनिधी /सांखळी
सांखळी सुर्ल गावकरवाडा येथील श्री नवदुर्गा मंदिराचा वार्षिक होमकुंड उत्सव 18 रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनीशी साजरा होणार आहे.
सोमवार दि.18 रोजी होमकुंड जत्रोत्सवानिमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक विधी, संध्याकाळी भजन, सुर्ल जत्रोत्सवानिमित्त ज्ये÷ नाटय़ कलाकारांचा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी देवस्थान अध्यक्ष रामा गावकर, पंच प्रशांत गावकर आणि देवस्थान पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गोविंद नाईक, विष्णू सुर्लकर, विश्वनाथ जोग, वासुदेव नाईक, बाळकृष्ण कोल्हापूरकर यांचा सन्मान होणार आहे.
रात्री 9 वा. पावणी त्यानंतर सुर्ल गावकरवाडातर्फे वसंत कानेटकरलिखित ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. यात सिद्धी बोन्दे (मुबंई) कुपेक्षा सतोडकर, प्रशांत गावकर, केदार परांजपे, सुदेश आमोणकर, रुपेश बांदोडकर, श्रीप्रसाद आमोणकर, अजित गावस, दिग्दर्शन तारी, संगीत प्रदीप शिलकर, सत्यवान शिलकर, नितीन बर्वे आदींच्या भूमिका आहेत. या संपूर्ण उत्सवाचा तसेच नाटकाचा लाभ घ्यावा, असे गावकर कुटुंबिय आणि ग्रामस्थांतर्फे काळवण्यात आले आहे.









