प्रतिनिधी /सांखळी
डिचोली तालुक्मयातील सांखळी नगरपालिका क्षेत्रात सांखळी गावचा पारंपरिक उत्सव मंगळवारी संध्याकाळी साजरा करण्यात आला..गावठाण येथील श्री सातेरी केळबाय मंदिरातून घोडे उत्सवास सुरवात झाली. या मंदिरात वर्ष पद्धतीने घोडे सजवले गेले आणि पूजन करण्यात आले,तेथुन शहरातील श्रीराधाकृष्ण देवस्थान,मंडपात घोडे उत्सव झाल्यावर सती स्थळ, या ठिकाणी परंपरेनुसार पूजन करण्यात आले .चोव्हाटा,तळयेर,राखणदार बांगला पुर्व, मारुती मंदिर, होळी परिसरात पारंपारिक घोडे उत्सव साजरा करण्यात आला.या वेळी सर्व मानकरी लोकांनी पारंपरिक पद्धतीने घोडय़ाचे पुजन केले.
गावठाण,सांखळी-पर्यें गावचे अतूट नाते सांगणारा उत्सव
सांखळी नगर पालिका क्षेत्रातील गावठाण, सांखळी गावचे पर्यें गावाशी असलेले अतुट नाते दाखवणारा हा उत्सव असल्याचे काही जाणकार सांगत आहेत, तसेच सांखळी गावात हिंदू- संघटित होऊन हा उत्सव साजरा केला जात आसल्याने धार्मिक एकतेचे प्रतिकही या दिवसात पाहायला मिळत आहे, तसेच सांखळी गावात पारंपरिक रित्या विविध धार्मिक कार्यक्रम ही साजरे होत असून हे पाहण्यासाठी लोकांची नेहमी गर्दी असते. गावातील पारंपरिक धूळवट धार्मिकविधी झाल्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम ने मराठी नववर्षाच्या स्वागताचे शिमगोत्सवाची सांगता होईल.









