पन्नासही बूथ वर स्थापना दिवस कार्यक्रम
सांखली/प्रतिनिधी
आज सम्पूर्ण गोव्यात भारतीय जनता पक्षचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला असून सांखळी मतदारसंघात ही पन्नास ही बुथ वर खास कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होतेसांखळी शहर तसेच पाळी, वेळगे, सुर्ला,कुडणे, हरवळे, आमोना, न्हावेली पंचायत क्षेत्रात सदर कार्यक्रम झाले
सांखळी भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमला मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, जिल्हा परिषद सदस्य गोपाळ सुर्लकर, महिला प्रतिनिधी सुलक्षणा सावंत नगराध्यक्ष यशवंत माडकर ,रश्मी देसाई, आनंद काणेकर, दयानंद बोर्ये कर, शुभदा सावईकर ,ब्रम्हां देसाई, राधिका सतोसकर कामत, सिद्धी प्रभु, विनय पंगम, कालिदास गावस,सरपंच, पच,बुथ अध्यक्ष, महिला संघटना प्रतिनिधी उपस्थित उपस्थित होती
सर्वप्रथम भाजपचे संथापक डॉ शाम प्रसाद मुखर्जी, पं, दीनदयाळउपाध्याय याच्या फोटोला मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पुष्पहार अर्पण करण्यात आले या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले
मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या घरावर भाजपचा झेंडा फडकवण्यात आले
आज भाजपच्या स्थापना दिवस निमित्त सांखळी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर भाजपचा झेंडा फडकणार आहे या साठी मोटय़ा प्रमाणात झेंडय़ाचे वितरण करण्यात आले आहे आज मंगळवारी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचा मतदारसंघात भाजपमय वातावरण पाहायला मिळाले
कोरोना काळा कुठेही गर्दी होऊ नये याची दक्षता आयोजकांनी घेतल्याचे पाहायला मिळाले









