पोट निवडणुकीत काँग्रेस समर्थक राजेंद्र आमेशकर विजयी मुजावरवाडा येथील बाबर पिर चे घेतले दर्शन
सांखळी/प्रतिनिधी
सांखळी नगर पालिकेच्या प्रभाग 9 मधील नगर सेवक दामोदर घाडी यांचे निधन झाल्याने नुकतीच या ठिकाणी पोट निवडणूक घेण्यात आली होती यात भाजप समर्थ क दशरथ आजगावकर तर कॉग्रेस समर्थक राजेंद्र आमेशकर यांच्यात निवडणूक बरीच रंगली होती आज दुपारी या निवडणूक चा निकाल उपजिल्हाधिकारी वायगणकर यांनी जाहीर केला यात राजेंद्र आमेशकर हे 260 मते मिळून विजयी झाले तर आजगावकर याना 241 मते प्राप्त झाली डिचोली मतमोजणी केंद्रावर कॉग्रेस समर्थकांनी जल्लोष केला वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, सांखळी मुजावर वाडा येथील बाबर पिर चे दर्शन घेतले प्रभाग 9 मधील सर्व मतदारांचा हा विजय असून रियाज खान यांचे परिश्रम आणि येथील नागरिकाचे आशीर्वाद मला विजयी करू शकले सरकारच्या सहकार्याने प्रभाग9 चा मी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न शील राहीन असे मत राजेंद्र आमेशकर यांनी व्यक्त केले
सांखळी आमची सर्वांची : धर्मेश सग्लानी
सांखळी नगर पालिका क्षेत्रातील प्रभाग 9 मधील जनतेने सलग चार वेळा आमच्या वर विश्वास ठेवून आमचा उमेदवार निवडून दिला त्या प्रति त्याचे आभार यात रियाज खान आणि आपल्या पेनलची मेहनत कामाला आली टू गेदर ऑफ सांखळी यांनी मतदारांना दिलेली सर्व आश्वासने पाळली जातील ही पोट निवडणूक महाभारत सारखी होती आणि त्यात विजय आम्ही मिळवला ,भयाचे वातावरण निर्माण करण्याचा सरकार कडून प्रयत्न केले जाणार आहे त मात्र आम्ही भिवपाची कायच गरज ना येत्या नऊ महिन्यात खूप काही होण्याची शक्मयता माजी नगराध्यक्ष धर्मेश सग्लानी यांनी व्यक्त केली आपल्या हक्कासाठी संघर्ष करा पुढे आम्हाला खुप काही जिंकायचे आहे असे ही सग्लानी म्हणाले
प्रवीण ब्लेगन ,नीलकंठ गावस, खेमलो सावंत यांनी ही या विषयावर विचार मांडले
सांखळी पालिकेत पुन्हा सात विरुद्ध सहा सदस्य
काही महिन्यांपूर्वीच सांखळी नगर पालिकेची सत्ता भाजप कडे आली होती आणि यशवंत माडकर नगराध्यक्ष झाले मात्र प्रभाग 9 मधील दामोदर घाडी याचे निधन झाले आणि सहा विरुद्ध सहा असा सत्ता संघर्ष सुरू झाला, उपनगराध्यक्ष पद लॉटरी कडून देण्यात आले तेथे कॉग्रेस च्या अंशीरा खान याची निवड झाली आणि पालिका सदस्य नाटय सुरू झाले व प्रभाग9 मध्ये अखेर निवडणूक झाली आणि येथही कॉग्रेस समर्थनक विजयी झाला आता कॉग्रेस गटात धर्मेश सग्लानी, कुंदा माडकर, अंशीरा खान, ज्योती ब्लेगन, राया पारसेकर,राजेश सावळ,राजेंद्र आमेशकर आणि भाजप गटात यशवंत माडकर, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर,शुभदा सवाईकर,रश्मी देसाई, ब्रह्मनंद देसाई यांचा समावेश आहे









