माजी आमदार प्रताप गावस यांची उपस्थिती
सांखळी / प्रतिनिधी
सांखळी नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज गुरुवारी सकाळी पालिकेच्या कार्यालयात निवडणूक झाली यात काँग्रेस समर्थक नगरसेवक राजेश सावळ यांची सात विरुद्ध सहा अशी निवड झाली भाजप समर्थक दयानंद बॉर्येकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता उपजिल्हाधिकारी याच्या देखरेखीखाली ही निवडून झाली मुख्य अधिकारी दीपक वायगणकर हेही उपस्थितीत होते
यावेळी नगराध्यक्ष राया पार्सेकर, धर्मेश सग्लानी, अंशीरा खान, कुंदा माडकर, ज्योती ब्लेगन, राजेंद्र आमेशकर, राजेश सावळ,तसेच कॉग्रेस समर्थक माजी आमदार प्रताप गावस, नीलकंठ गावस,महादेव खांडेकर, वरेकर, तसेच सवाळ याचे समर्थक उपस्थित होते,
सांखळी करांच्या विश्वासाला पात्र ठरेन ः सावळ
आज सांखळीकरानी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास मी पात्र ठरेन सगळय़ांच्या सहकार्याने सांखळी शहराच्या विकासा साठी मी नेहमी कार्यरत राहीन आणि माझ्या विर्डी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारच्या सहकाऱयांने विविध उपक्रम हाती घेणार आहे कोरोना महामारी काळात कोणतेही राजकारण न करता लोक हींथार्थ आपण काम करणार असून आज माझ्या सहकाऱयांनी मला उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली असेच यापुढे ही आम्ही संघटित पणे साखळीचा विकास साधणार आहे असे मत उपनगराध्यक्ष राजेश सावळ या वेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले
भाजप समर्थक दयानंद बोर्येकर यांचा अर्ज
सांखळी नगरपालिकेत सात विरुद्ध सहा असे मत प्रदर्शन असताना ही भाजप समर्थक नगर सेवक दयानंद बोर्येकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केला होता मात्र सात विरुद्ध सहा असे मतप्रदर्शन पाहायला मिळाले भाजप समर्थक यशवंत माडकर, आंनद काणेकर, शुभदा सावई कर, रश्मी देसाई, ब्रम्हां देसाई याची उपस्थिती होती









