एका सदस्यास कोरोना झाल्याने भाजप समर्थक गैरहजर
प्रतिनिधी / सांखळी
सांखळी नगरपालिका सदस्यांचे राजकीय नाटय थांबण्याचे नाव घेत नाही. नुकताच भाजप सामर्थक सहा पालिका सदस्यांनी उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांच्यावर अविश्वास ठराव मांडला होता. आज शुक्रवारी संध्याकाळी त्यावर चर्चा होणार होती मात्र भाजपचे समर्थक गैरहजर राहिल्याने 7/0 अशा फरकाने अविश्वास ठराव बारगळला.
सत्ताधारी गटातील नगराध्यक्ष राया पार्सेकर, उपनगराध्यक्ष राजेश सावळ, धर्मेश सगलानी, कुंदा माडकर, राजेंद्र आमेशकर, ज्योती ब्लेगन, अँसिरा खान यांची उपस्थिती होती. सांखळी पालिका कार्यालयात देखरेख करण्यासाठी सरकारी अधिकारी उपस्थित होते.
सरकारने सांखळीच्या विकासाकडे लक्ष द्यावे : नगराध्यक्ष
सरकारने राहिलेल्या वेळेत पूर्णपणे सांखळीच्या विकासाकडे लक्ष द्यावे. आम्हाला राजकारण करायचे नसून सांखळी पालिका क्षेत्रातील लोकांनी आम्हाला विकास करण्यासाठी निवडून दिले आहे, असे मत नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी या विषयी बोलताना सांगितले
साथी नगरसेवकाला कोरोना झाल्याने अनुपस्थित : यशवंत माडकर
भाजपा समर्थक एका सदस्यास कोरोना झाल्याने आम्ही अविश्वास ठराव चर्चेला उपलब्ध होऊ शकलो नाही. उद्या होणाऱया नगराध्यक्ष अविश्वास ठराव चर्चेलाही आम्ही उपलब्ध होऊ शकणार नाही तरी लवकरच सांखळी पालिकेची सत्ता लवकरच आमच्याकडे असेल, असा विश्वास यशवंत माडकर यांनी या विषयी बोलताना व्यक्त केला
भाजप समर्थकात सहा नगरसेवक
सांखळी पालिकेत तेरा नगरसेवक असून भाजप गटात शुभदा सावईकर, रश्मी देसाई, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, ब्रम्हा देसाई हे सर्वजण असून लवकरच एक नंबर वाढण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. आज शनिवारी होणाऱया नगराध्यक्ष अविश्वास ठराव चर्चा करण्यासाठी हे उपलब्ध नसणार असल्याची माहिती मिळाली आहे. तरी या विषयी नेमके काय होईल या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे









