प्रतिनिधी / सांखळी :
गोवा राज्य कायदेशीर सेवा आणि नालसा यांच्या संयुक्त विद्यमाने सांखळी रवींद्र भवनात आज सकाळी महाकायदेशीर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात विविध विषयांवर माहिती देण्यात आली.
प्रारंभी शाळकरी मुलांनी स्वागतगीत सादर केले, तर गोव्यातील लोकनृत्य मरुलो सादर करण्यात आले. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बी. आर गवई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, न्यायाधीश एस. सी. गुप्ता, एम. एस, सोनक, एन. डब्ल्यू. सांबरे, एम. एस, कार्णिक, एन. डी. सरदेसाई, एम. एस, जवळकर, देविदास पांगम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाशिबिर सांखळीत घेता आले याचा आनंद : मुख्यमंत्री
सांखळीसारख्या ग्रामीण भागातील जनतेला गोवा राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरण आणि नालसा यांचे मोलाचे कायदेशीर ज्ञान या कार्यक्रमामुळे मिळवता आले. यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मनापासून आभार. सांखळीच्या इतिहासात प्रथमच असा कार्यक्रम झाल्याचा आनंद आहे. कोर्टामध्ये न्यायदानाचे पवित्र कार्य करणाऱया उच्चपदस्य व्यक्तींकडून कायद्याविषयीचे मार्गदर्शन सांखळीवासीयांना करण्यात येत आ। असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांखळी रवींद्र भवन परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राष्ट्रीय विधी सेवा योजना 2016
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर सेवा) योजना 2016 चे कायदे राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवरील नागरिकांना सहाय्य आणि प्रतिनिधीत्व मजबूत करणे कायदेशीर बंधन बनविणे, ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय आणि अन्य कार्यक्रमांमध्ये प्रवेश सुनिश्चित करते. न्यायाधीश आणि अपील न्यायाधीकरण या सारख्या वृद्धाश्रमांची स्थापना करणारे अधिकारी आणि संस्था सुनिश्चित करते.
नालसा म्हणजे….
नालसा म्हणजे कायदेशीर सेवा प्राधिकरणाची स्थापना कायदेशीर प्राधिकरण अधिनियम 198 अंतर्गत केली आहे. जेणेकरून समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा मिळाल्या पाहिजेत आणि समाजातील विविध वाद शांततेच्या मार्गाने तडजोडीने सोडविण्यासाठी लोक अदालत आयोजित करणे ही कामे नालसाची आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱया समस्यांची ओळख, विविध योजनांची अमंलबजावणी आदी नालसाविषयी सविस्तर माहिती देणारे हे प्रशिक्षण शिबीर सांखळी मतदारसंघातील जनतेसाठी घेण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.









