सोहोलीत महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा रास्तारोको
प्रतिनिधी / कडेगांव
कृषीपंपाचा वीज पुरवठा कोणती ही पूर्व सूचना न देण्यात येता बंद केल्याच्या कारणावरुन सोहोली(ता.कडेगाव) येथील शेतकऱ्यांनी सांगली – सातारा जूण्या महामार्गावरती रस्ता रोको केला.या वेळी या महामार्गावरुन प्रवास करणारे सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी शेतकरऱ्यांचे प्रश्र व महावितरणची समस्या समजावून घेऊन सोहोली गावातील सरसकट कृषी शेतीपंपाना दोन हजार रुपये भरुन घेऊन विज जोडणी करावी व राहिलेली रक्कम एक महिन्याने हप्त्या – हप्त्याने जमा करावीत असा तोडगा काढण्यात आला.
गावातील सर्वसाधारण विस-बावीस ट्रान्सफॉर्मर वरील सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या बिलांच्या रक्कमेच्या बिलापोटी पाच लाख रुपयेचा धनादेश गावचे भाजपा युवानेते संदीप मोहिते यांनी दिला. व या महामार्गावरील वाहतूक सूरळीत करण्यात आली. सर्व सामावेश तोडगा निघाल्याने शेतकरी ग्रामस्थवर्गात समाधाणाचे वातावरण आहे. या वेळी सर्जेराव मोहिते, सूरेश मोहिते, भुजंगराव माळी, दिनकरराव मोहिते,सूहास साळूंखे, संभाजी मोहिते, सदाशिव मोहिते, शंकर देशमुख, रघुनाथ पवार, रामभाऊ मोहिते,दिलखूष कदम,पिंटू मोहिते, नारायण मोहिते, जगदिश देशमुख,हर्षल नलवडे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.








