महाराष्ट्राला वरदान मिळाले आहे, ते सहय़ाद्रीच्या कडेकपाऱयांचे. या सहय़ाद्रीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले गड किल्ले बांधले. याच गडकिल्ल्यावरून बांधलेले स्वराज्याचे तोरण अटकेपार आपला झेंडा रोवू शकले. या सहय़ाद्रीच्या डोंगररांगांमध्ये फिरणारा एक तरूण म्हणजे नागेश बेडका. त्याने आजवर सहय़ाद्रीच्या खोऱयातील 70 हून अधिक लहान मोठय़ा गडकिल्ल्यांना भेटी देऊन दुर्ग भ्रमंती केली आहे.
नागेश हा बेळगाव तालुक्मयातील बसवण कुडची गावचा रहिवासी. लहानपणापासून गावात दिवाळीत मातीचे किल्ले करत असताना शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच दुर्ग भ्रमंतीचा प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम आसपासच्या भागातील किल्ले त्याने पायी सर केले. यानंतर सहय़ाद्री टॅकर्स हा बेळगावच्या 11 टॅकर्सनी एकत्रित येऊन ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर जाण्यास त्यांनी सुरुवात केली.
आजवर सिंहगड, राजगड, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, जंजिरा, साल्हेर-सालोटा, मोरा-मुल्हेर, हरगड, हरिश्चंद्रगड, रतनगड, शिखर कळसुबाई, मंगळगड, चंद्रगड, शिवनेरी, पुरंदर सर केले. तर सहय़ाद्रीतील आलम-मदन-कुलम हे अवघड श्रेणीतील गडकिल्लेही त्याने सर केले आहेत. पुणे येथील वेस्टर्न ग्रुपमधूनही नागेशने दुर्ग भ्रमंती केलेली आहे.
वन्य जीवांशी संपर्क
आपल्या सभोवताली अनेक प्राणी, पक्षी असतात. परंतु आपल्याला त्याचे तितकेसे महत्व नसते. जेव्हा सहय़ाद्रीच्या कडे कपारींमधून फिरताना वन्य जीवांचा संपर्क होतो, तेव्हा त्यांचे सौंदर्य अधिक जवळून पाहता येते. यामुळेच प्राण्यांविषयी अधिक जिव्हाळा निर्माण झाला. सापांविषयी असणारी मनातील भीती कमी झाल्यामुळे शहरांमध्ये असणारे साप पकडून ते जंगलांच्या अधिवासामध्ये सोडण्याचे काम नागेशने सुरू केले.
केवळ अभ्यास महत्वाचा
सध्या दुर्गभ्रमंती म्हणजे एक फॅशन झाली आहे. गडांवर जायचे व फोटो काढायचे, मौजमजा करायची असा त्यांचा हेतू असतो. बऱयाच वेळी दुर्गभ्रमंती करताना त्याची भौगोलिक परिस्थिती न पाहताच गड सर केला जातो. यामुळे जंगलामध्ये व कडेकपाऱयांमध्ये अडकण्याची शक्मयता असते. असाच प्रसंग नागेश व त्यांच्या सहकाऱयांवरही आला होता. चुकीच्या मार्गाने मंगळगड सर केल्याने बुरूजावर अडकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. अखेर एका झाडाची मदत घेऊन तो बुरूज चढावा लागला.
छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळय़ांनी मेहनत घेऊन या किल्ल्यांवर स्वराज्याचे तोरण बांधले. परंतु आजचे युवक मात्र गड किल्ल्यांवर जाऊन आपली व प्रेयसीची नावे कोरण्यात धन्यता मानतात. आमच्या सहय़ाद्री टेकर्सच्या माध्यमातून अशी जेवढी नावे पुसता येतील तितकी नावे पुसण्याचा आमचा प्रयत्न असतो. परंतु युवकांनी अशाप्रकारे ऐतिहासिक किल्ल्यांवर नावे कोरू नयेत, असे नागेश यांनी सांगितले.
सुशांत कुरंगी