प्रतिनिधी/ बेळगाव
देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या कोवीड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनतेला हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत मदत व्हावी म्हणून येथील सह्याद्री सहकारी सोसायटीच्यावतीने केंद्र सरकारच्या कोरोना आर्थिक साहाय्य निधीला 51 हजाराची मदत देण्यात आली आहे. सदर रकमेचा धनादेश बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
सोसायटीचे चेअरमन बी. बी. सैनुचे यांच्यासह संचालक एन. बी. खांडेकर, प्रा. विक्रम पाटील, पी. पी. बेळगावकर, आर. बी. बांडगी, प्रा. पी. आर. निर्मळकर, ऍड. एस. जी. बांदिवडेकर, किरण पाटील, माजी चेअरमन प्रा. ए. एस. देसाई, सचिव ए. जे. कणबरकर, शाखा व्यवस्थापक एम. आर. निलजकर आदी उपस्थित होते.









