वार्ताहर / कास
शासनाने कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्प लादून महाबळेश्वर, जावली तालुक्यातील कोयना धरणग्रस्थांचे मानगुटिवर जणू भस्मासूरच बसवला आहे प्रत्येक वर्षी वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.व्याघ्र प्रकल्पाची कोणती ही अधिसूचना लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. प्रकल्पाच्या उद्देशा बाबतीत जनतेला काही माहिती नाही. व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दाखवायचा तो कायदा व न्याय असाच अर्थ जनतेने समजायचं का ? वन्यजीव कायदा वन्यजीवांचे रक्षणार्थ आहे तर शेतकऱ्यांच्या हितार्थ पण कायदा असायला हवाच.
कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हद्दीतून मौजे मोरणी,महाळूंगे,आरव,वलवण ,शिंदी, चकदेव,पर्वत हि सात गावे वगळून व्याघ्र प्रकल्पाची सिमा आखावी, तसेच उपअभयारण्य (बफर झोन) रद्द करण्यात यावा अशी जनतेची मागणी आहे. मात्र शासन प्रशासन या बाबतीत अश्वासन देऊन देखील अंतिम निर्णय घेण्यात विलंब करीत आहे. सदर प्रकल्प नेमका कोयना धरणग्रस्तांचे मानगुटिवर का बसवला गेला असा प्रश्न जनतेला पडला आहे आधीच कोयना धरणाने उध्वस्त केले त्यातून सावरण्याचा प्रयत्न होत असतांनाच पुन्हा अभयारण्य प्रकल्पाच्या जाळ्यात टाकून शासनाने इथले जनजीवन उध्वस्त करून टाकले आहे. या प्रकल्पामुळे प्रकल्प हद्दी लगतच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांची हजारो एकर शेत जमिन बिना शेती पडून राहू लागली आहे.
वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान असाहाय्य होऊन शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी विना शेती पडून राहू लागल्याने त्या जमिनी जंगलमय होऊ लागल्या आहेत अधिकतर वरकसी जमिनी असल्याने नाचणी, वरी या पिकांसाठी झुडपे तोडूनच भाजनावळ करावी लागते. तिथही वन विभागाचे अधिकारी यांच्या कडून हरकती घेण्याचे प्रकार वाढू लागलाय अशा शेतकऱ्यांचा उदर निर्वाह कसा होणार ? याचे उत्तर वन विभागाचे अधिकारी जनतेला देत नाहीत लोकशाही मध्ये शेतकऱ्यांवर असा अन्याय हि लोकशाहीची चेष्टाच म्हणावी लागेल.
कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र खूपच मोठे असून महाबळेश्वर तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हद्दीतील सात गावे वगळून उपअभयारण्य ( बफर झोन) रद्द करून प्रकल्पाची सिमा रेशा आखणे हा एकमेव पर्याय असून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा त्याचबरोबर उर्वरीत अभयारण्य हद्दीवर कुंपण घालून हद्दी लगतच्या गावातील शेतकऱ्याला चिंता मुक्त करायला हवे अशी अपेक्षा महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी कोयना सोळशी खोऱ्यातील शेतकऱ्यांचे हितार्थ कांदाटी खोऱ्यातील सोळा गाव पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते श्री सिताराम जंगम सर , राजाराम निवळे, संजय मोरे ,शिवराम चव्हाण,भगवान भोसले,जानू जाधव, रगूनाथ साळुंखे, हरीष निवळे, सुरेश शेलार , ताताराम शिंदे ,गणपत कदम यांनी व्यक्त केली आहे.
Previous Articleमहिला कुस्तीगिरांच्या खुराकासाठी खा.कोल्हे धावले
Next Article महाराष्ट्र,कोयना एक्सप्रेस रविवारपासून रुळावर









