प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर वन विभागाचा सह्याद्रीमधील 7 वनक्षेत्रांना ‘संवर्धन राखीव वनक्षेत्रा’चा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारने मान्य केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य वन्यजीव मंडळा’च्या बैठकीत याला मंजुरी मिळाली. त्यामुळे साताऱयातील जोर-जांभळीपासून सिंधुदुर्गातील ‘तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रा’पर्यंत ‘सह्याद्री व्याघ प्रकल्पा’चा वन्यजीव भ्रमणमार्ग जोडला जाणार आहे. जिल्ह्यातील 5 वनक्षेत्रांचा यामध्ये समावेंश आहे.
कोल्हापूर वन विभागाने साताऱयातील जोर-जांभळी, कोल्हापूरमधील विशाळगड, पन्हाळा, गगनबावडा, आजरा-भुदरगड, चंदगड आणि सिंधुदुर्गमधील आंबोली-दोडामार्ग येथील वनक्षेत्रांना ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’चा दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला ‘राज्य वन्यजीव मंडळा’ची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सह्याद्रीमधील 86 हजार 554 हेक्टर वनक्षेत्राला संरक्षणाचा दर्जा मिळाला आहे. साताऱयातील ‘मायणी’ पक्षी अभयारण्य, वनक्षेत्रालाही `कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’चा दर्जा मिळाला आहे.
सह्याद्रीमध्ये प्रस्तावित सात ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये केवळ त्या-त्या परिसरातील राखीव वनक्षेत्रांचा समावेश आहे. यातील जागा वन कायद्यांतर्गत संरक्षित होतात, तर ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये आरक्षित जागा `वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित होतात. त्यामुळे अशा जागांना राखीव वनक्षेत्राच्या संरक्षणापेक्षा उच्च दर्जाचे संरक्षण मिळत असल्याचे कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. बेन क्लेमेंट यांनी सांगितले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा अरुंद पट्टÎाच्या वनक्षेत्राने ‘राधानगरी वन्यजीव अभयारण्य’ व पुढे ‘तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रा’ला जोडला आहे. वन्यजीवांच्या स्थलांतरासाठी आवश्यक अरुंद वनक्षेत्र मोठÎा क्षेत्रामध्ये संरक्षित करणे आवश्यक आहे. सह्याद्रीमधील मान्यता मिळालेल्या या सात ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’मुळे हे अरुंद वनक्षेत्रे मोठÎा क्षेत्रांमध्ये संरक्षित होणार आहेत. त्यामुळे वन्यजीव, वाघांचा भ्रमणमार्ग हा दक्षिणेकडील तिलारीपासून उत्तरेकडील जोर-जांभळीपर्यंत जोडण्यास मदत झाल्याचे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी सांगितले.
कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणजे काय ?
‘वन्यजीव संरक्षण कायद्यातर्गत कॉन्झर्वेशन रिझर्व्ह, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्पांना मान्यता मिळते. एखादे क्षेत्र कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून जाहीर झाल्यास तेथील स्थानिकांचे हक्क अबाधित राहतात. महत्त्वाचे वन्यजीव भ्रमणमार्ग किंवा अभयारण्य वा राष्ट्रीय उद्यानांच्या कवच क्षेत्रांना कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा दर्जा देण्यात येतो.
राखीव संरक्षित वनक्षेत्रात कोल्हापूर जिल्हÎातील विशाळगड 9,324, पन्हाळा 7,291, गगनबावडा 10,548, आजरा-भुदरगड 24,663, चंदगड 22,523 हेक्टर वनक्षेत्राचा समावेश आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अनुषंगांने ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’चे आरक्षण महत्त्वाचे आहे. कारण, त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा वन्यजीव व्याघ्र भ्रमणमार्गाच्या सीमा विस्तारणार असल्याचे मत वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी व्यक्त केले.