पोलिसांना सतत गुंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद
प्रतिनिधी / अक्कलकोट
वागदरी ता.अक्कलकोट येथे ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. ते दु १ वा. चे दरम्यान घरासमोर खेळत असणाऱ्या ६ वर्षे वयाच्या लहान मुलीस घराशेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने घरी कोणी नसताना बिस्कीट आणण्यास पाच रूपये देऊन बिस्कीट घेऊन आल्यानंतर आरोपीने स्वतःच्या घरात ओढत नेऊन हाताने चिमुरडीचा गळा दाबुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत उत्तर पोलीस स्टेशन मध्ये शंकर सुरेश गवंडी (वय-३५ वर्षे, रा. वागदरी ) यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटना घडल्यापासून आरोपी हा वागदरी गावातून पळ काढला होता. पोलीस हवालदार विपीन सुरवसे, पो. कॉ. सीताराम राऊत, व राम चौधरी हे गेल्या दोन दिवसांपासून आरोपीच्या शोधात होते. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळताच इस्लामपूर जि सांगली येथे शोध घेतले.
आरोपीला पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी इस्लामपूर मधून पळ काढून पुणे गाठले. पोलीस पुण्यात आल्यानंतर पुन्हा आरोपीने पुणे सोडून कर्नाटक राज्यातील शेडम गाठले. पोलीस हवालदार विपीन सुरवसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चलाखीने आरोपी शंकर सुरेश गवंडी (वय-३५ वर्षे, रा. वागदरी ) यास शेडम जि गुलबर्गा येथे मुसक्या आवळल्या व ताब्यात घेऊन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गाठले दि ८ जानेवारी रोजी अटक केले. पोलिसांनी केलेल्या तपासाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सदर घटनेबाबत मुलीच्या आजीने फिर्याद दिली होती. पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.