ईईएसएल यांची माहिती : सरकारी योजनांच्या आधारे बल्बचे वितरण
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी इफीशिएन्सी सर्व्हिसेस लि. (ईईएसएल)यांनी दिलेल्या माहितीनुसार उजाला योजनेच्या अंतर्गत मागील सहा वर्षांमध्ये 36.69 कोटीपेक्षा अधिक एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे.
याचदरम्यान रस्त्यावरील विद्युत दिवे लावण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (एसएलएनपी) यांच्या आधारे 1.14 कोटी एलईडी लावण्यात आले आहेत. ईईएसएलच्या माहितीनुसार या सरकारी योजनांच्या माध्यमामधून आतापर्यंत संचयी रुपाने 55.32 अब्ज किलोवॅट वर्षाच्या आधारे वीज बचत झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जानेवारी 2015 रोजी उजाला आणि एसएलएनपी कार्यक्रमांची सुरुवात केली होती. 6 वर्षे पूर्ण झालेल्या दोन्ही कार्यक्रमातील आकडेवारी लक्षात घेत सदरची माहिती दिली आहे. ईएसएलने 3669 कोटी एलईडी बल्ब वितरीत केले आहेत आणि 1.5 कोटी एलईडी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत.
कार्बनमध्ये घट
वर्षाच्या आधारे जवळपास 3.859 कोटी टन कार्बनडायऑक्साइड (सीओ2) उत्सर्जनात घसरण आली आहे. याच्या व्यतिरिक्त स्वस्त दरात 72 लाख एलईडी टय़ूबलाईट आणि 23 लाख ऊर्जाक्षम पंख्यांचे वितरण केले आहे.









