सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता संसर्ग
तीन दिवसात 15 जणांचे मत्=यू
सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 409
चिंताजनक रुग्णांची संख्या 88
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्गात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने चिंता वाढली असून रविवारी जिह्यात 341 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर एकाच दिवसात सहा रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोना रुग्णवाढीबरोबरच मृत्यूची संख्याही वाढू लागली असून गेल्या 72 तासात 15 जणांना मृत्यूने गाठले. त्याशिवाय 88 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. एप्रिल महिना सुरू झाला आणि कोरोनाची मोठी लाट सिंधुदुर्ग जिह्यातही उसळली आहे. गेल्या 18 दिवसात तबबल 2 हजार 785 रुग्ण आढळले. तर 33 जणांचे बळी गेले. अजूनही कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढतच आहेत
रविवारी जिह्यात आणखी सहा रुग्णांचा कोरोनाने बळी गेला. त्यामुळे आतापर्यंतच्या मृत्यूची संख्या 216 झाली आहे. गेल्या तीन दिवसात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. 16 एप्रिलला चौघांचा मृत्यू, 17 एप्रिलला पाचजणांचा तर रविवारी 18 एप्रिलला सहाजणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात वैभववाडी तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. उंबर्डे येथील 78 वर्षीय महिला, दिगशी येथील 67 वर्षीय पुरुष आणि नाधवडे येथील 65 वर्षीय पुरुष या तिघांचा मृत्यू झाला असून त्यांना उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. तसेच मालवण तालुक्यातील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिलाही उच्च रक्तदाबाचा त्रास होता. कणकवली येथील 79 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून त्याला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
आणखी 341 कोरोना पॉझिटिव्ह
जिल्हय़ात रविवारी आणखी 341 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा हजाराच्या जवळ पोहोचली असून एकूण 9 हजार 907 झाली आहे.
एका दिवसात 177 जणांना डिस्चार्ज
कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना बरे होणाऱया रुग्णांची संख्या कमीच होती. मात्र, रविवारी एकाच दिवशी 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 7 हजार 276 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
88 जणांची प्रकृती चिंताजनक
सक्रिय रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असून सद्यस्थितीत 2 हजार 409 पर्यंत सक्रिय रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे चिंताजनक रुग्णांची संख्याही वाढली आहे. 88 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 70 रुग्ण ऑक्सिजनवर तर 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
कणकवली तालुक्यात सर्वाधिक 68 रुग्ण
रविवारी आढळलेल्या एकूण 341 रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यात सर्वाधिक 68 रुग्ण आहेत. तसेच देवगड 59, दोडामार्ग 17, कुडाळ 45, मालवण 26, सावंतवाडी 41, वैभववाडी 41, वेंगुर्ले 42, जिह्याबाहेरील 2.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सद्यस्थिती- नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 329, (12 जिल्हय़ाबाहेरील लॅब) एकूण 341, सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण एकूण – 2,409, सीसीसी सेंटरमधील रुग्ण-202, डीसीएचसीमधील रुग्ण-72, डीसीएचमधील रुग्ण – 229, सद्यस्थितीत उपचारासाठी जिह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6, आजअखेर बरे झालेले रुग्ण – 7,276, आजअखेर मृत झालेले रुग्ण-216, आजपर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 9,907.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड- 957, दोडामार्ग – 528, कणकवली – 2670, कुडाळ – 2056, मालवण – 995, सावंतवाडी – 1297, वैभववाडी – 549, वेंगुर्ले – 799, जिल्हाबाहेरील रुग्ण-56.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 342, दोडामार्ग – 140, कणकवली – 439, कुडाळ -403, मालवण -302, सावंतवाडी – 293, वैभववाडी – 306, वेंगुर्ले – 160, जिह्याबाहेरील रुग्ण – 24.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू- देवगड तालुक्यातील एकूण – 17, दोडामार्ग-5, कणकवली-52, कुडाळ-38, मालवण-23, सावंतवाडी-46, वैभववाडी-22, वेंगुर्ले -12, जिह्याबाहेरील -1.
टेस्ट रिपोर्टस् : आर.टी.पी.सी.आर. आणि ट्रुनॅटटेस्ट -तपासलेले नमुने आजचे 948, एकूण-56,283, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने – 6,986.
ऍन्टिजन टेस्ट : तपासलेले नमुने आजचे – 83, एकूण- 32,672, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने- 2,984.
जि. प. कर्मचाऱयाचाही कोरोनाने मृत्यू
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी माधव वझे यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात बरेच दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अतिशय शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावाचे ते होते. त्यांच्या जाण्याने कर्मचारी वर्गाने शोक व्यक्त केला आहे.









