कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे युरोपियन महासंघाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. महासंघाच्या सेवाक्षेत्राचा निर्देशांक नोव्हेंबरमध्ये गेल्या सहा महिन्यांमधील सर्वात नीचांकी पातळीवर गेला. विविध कंपन्यांच्या खरेदी व्यवस्थापकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार निर्देशांक एक महिन्यात 46.9 टक्क्यांवरून 41.3 टक्क्यांवर आला आहे.
हा मेपासूनचा नीचांक आहे. निर्बंधांमुळे अनेक उद्योग बंद ठेवावे लागले आहेत. त्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. दुसऱया लाटेचा प्रभाव किमान आणखी 2 महिने टिकेल असे अनुमान आहे.









