प्रतिनिधी / बोरगाव
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील राजकुमार धुळप्पा निंबाळे यांचा मोठा मुलगा समर्थ राजकुमार निंबाळे (२०) याचा गुरुवारी २३ जानेवारी रोजी कॉलेज सहलीत कुलू मनाली येथे असताना हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला आहे. समर्थ उल्लास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे B.Sc. Agri. च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो सहलीत सहभागी होऊन कुलू मनाली येथे गेला होता. कुलू मनाली येथील अतिथंड हवामानामुळे तेथेच त्याला हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. वागदरीचे प्रगतशील शेतकरी धुळप्पा निंबाळे यांचा तो नातू होता. समर्थचे वडील राजकुमार निंबाळे हे सोलापूर मुख्यालयात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. समर्थच्या दुर्दैवी व लहान वयात जाण्याने वागदरीवर शोककळा पसरली आहे. सर्वस्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.