वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट अरण्य प्रदेशात सशांची शिकार करणाऱया चौघांना अटक करण्यात आली आहे. वनखात्याचे अधिकारी ए. एन. नेगिनाळ यांच्या नेतृत्त्वाखाली सदर कारवाई करण्यात आली. बागलकोट तालुक्यातील संगापूर क्रॉसजवळ सर्व्हे नंबर 45 च्या वनपरिसरात सशांची शिकार होत असल्याची माहिती वनखात्याच्या अधिकाऱयांना मिळाली होती. त्यानुसार योग्य सापळा रचून त्याठिकाणी धाड टाकण्यात आली. दरम्यान, सहा सशांची शिकार केलेल्या चौघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. या कारवाईत वनअधिकारी रुप व्ही. के., ए. एम. अलियार, अनिलकुमार राठोड, प्रशांत आदींनी भाग घेतला.









