तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
हातउसने घेतलेली रक्कम परत न करता सव्वा दोन लाखांची फसवणूक केल्याबद्दल पती-पत्नी विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रसन्न बाळकृष्ण बोरगावकर वय 57 विशाल नगर जुळे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीरभद्र संतुकराव मंगनाळे व आशा वीरभद्र मंगनाळे दोघे राहणार विशालनगर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. मंगनाळे यांनी घरगुती अडचणी निर्माण झाल्याने फिर्यादी कडे पैशाची मागणी केली त्यावेळी फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेवून जून 2017 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत धनादेश व रोख स्वरूपात हातउसने म्हणून 12 लाख 25 हजार रुपये इतकी रक्कम दिली होती. या रकमेपोटी त्यांनी दिलेला धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे फिर्यादीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार मोरे हे करीत आहेत.









