प्रतिनिधी / सातारा
शहरातल्या कोरोनाला बाहेर हाकलून काढण्यासाठी चांगल्या सवयी कशा गरजेच्या आहेत.हे शहरात कॉलन्या, अपारमेण्ट, झोपडपट्टी येथे जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. आतापर्यंत सवयभानच्या टीमकडून सातारा शहरातल्या 22 हजार 777 घरांची तपासण्या केल्या आहेत.1 लाख 600 नागरिकांनी मार्गदर्शन केले आहे. कोरोनाला हरवायचे आहे सातारकर सतर्क रहायचे आहे, अशी साद त्यांना मिळत आहे.
सातारा शहर व उपनगरात कोरोनाची एण्ट्री मार्च महिन्यापासून झाली आणि कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत गेला. या विळख्यातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि कोरोनाला शहरातून हाकलून देण्यासाठी शहरातील विविध संघटना मान्यवर सातारा शहराच्या भल्यासाठी एक झाले. शहरवासीयांनी नियम पाळणे गरजेचे आहे. हे ओळखून अभ्यासून त्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. या कार्यात राजेंद्र चोरगे, जयेंद्र चव्हाण, वसंतशेठ जोशी यांच्यासह मान्यवरांच्या सहभागातून आणि संकल्पनेतून शहराच्या सुरक्षेसाठी काय काय करायला हवे हा विचार पुढे आला अन् शहरात प्रत्येक घराघरात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली. नागरिकांना मार्गदर्शन सुरू केले. छोटे छोटे नियम आहेत ते पाळण्याची विनंती केली जाऊ लागली. आज शहरातील 22 हजार 777 घरात जाऊन तपासणी केली आहे.नागरिकांकडून प्रतिसाद आणि कौतुक होत आहे.
मीच माझ्या सातारकरांचा रक्षक च्या माध्यमातून सवयभान उपक्रम अंतर्गत कॉलनी, अपार्टमेंटमध्ये जाऊन प्राथमिक आरोग्य तपासणी ऑक्सिजन आणि टेम्प्रेचर चेकिंग लॉक डाऊन मध्ये होत आहे, याला सातारच्या जनतेचे चांगले सहकार्य होत असून सवयभान चे कौतुक होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








