तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर शहर जिल्ह्यातील कटिंग सलूनचे दुकान उघडण्यास परवानगी न दिल्यामुळे आज मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर केस कापून आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
नाभिक समाजाचे कटिंग सलून उघडू द्या या मागणीचे निवेदन काही दिवसांपूर्वी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले होते. मात्र परवानगी न दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्त्यावरच केस कापून आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारचा धिक्कार असो, नाभिक समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. लवकरात लवकर कटिंग सलून उघडण्यास परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला. यावेळी नगरसेवक गणेश पुजारी यांच्यासह वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यापासून श्रीमंतांना सवलत मग नाभिक समाजाला का नाही ?
मागील 85 दिवसापासून नाभिक समाजाचे कटिंग सलून बंद आहेत. त्यांचा उदरनिर्वाह बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यापासून श्रीमंतांना सवलत दिली. नाभिक समाजाच्या कटिंग सलूनला परवानगी दिली नाही. हा समाज कायम उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने कटिंग दुकान उघडण्यास परवानगी द्यावी. तर भविष्यात तीव्र आंदोलन करू. – आनंद चंदनशिवे, नगरसेवक, वंचित बहुजन आघाडी
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









