मेक देम स्माईल-अमूल्य बुंद संस्थेचा उपक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
मेक देम स्माईल फौंडेशन व अमूल्य बुंद या संस्थेच्यावतीने बुधवारी गरीब सलून क्यावसायिकांना ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेनरी मशीन व इतर साहित्य देण्यात आले. शहरातील 10 सलून चालकांची निवड करून त्यांना या मशीन देण्यात आल्या.
कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे छोटय़ा व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. सलून व्यवसाय तर मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा सलून चालकांची निवड करून त्यांना या संस्थांच्या मदतीने सॅनिटायझर देण्यात आले. वडगाव, शहापूर, टिळकवाडी, शेट्टी गल्ली, वैभवनगर, यमनापूर, रविवार पेठ, बॉक्साईट रोड, अनगोळ या भागामध्ये वाटप करण्यात आले.
ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन, 10 हॅन्डग्लोव्हज, फेसशिल्ड यासह इतर साहित्य सलून चालकांना पुरविण्यात आले. यावेळी सर्फराज खतीब, दीपक पटेल, कैसर खतिब, शकील कादरी, अमर रोकडे, निखिल तरगडे, अमूल्य बुंद संस्थेच्या संचालिका आरती भंडारे उपस्थित होत्या.









