अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 17 ऑक्टोबर 2021, स. 10.45
● शनिवारी रात्री अहवालात 72 बाधित
● एकुण 3,053 जणांची तपासणी
● पहिला डोस घेतलेले 19 लाखांच्या वर
● दुसरा डोस घेतलेले 8 लाखांच्या वर
● बाधित वाढ मंदावल्याचा दिलासा
● तिसऱ्या लाटेची शक्यता मावळली
सातारा / प्रतिनिधी :
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत घसरलेला कोरोना संसर्गाचा आलेख ऑक्टोबर महिन्यात नवरात्र उत्सवात देखील दिलासादायकरित्या घसरलेला असून, गेल्या सात दिवसांपासून सलग बाधित वाढ शंभरच्या खाली राहिलेली आहे. 11 ऑक्टोबर रोजी बाधित वाढीचा आलेख शंभरच्या खाली आला त्यादिवशी 75 नवीन त्यांची नोंद झाली होती. त्यानंतर 16 तारखेला 47 एवढी गत आठ महिन्यांतील नीचांकी बाधित वाढ झाली. शनिवारी रात्री चा अहवाल देखील फक्त 72 जणांचा अहवाल बाधित आला आहे.
पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांवर स्थिर
शनिवारी प्रशासनाकडून पोर्टलवरून देण्यात आलेल्या अहवालानुसार 3,053 जणांची तपासणी करण्यात आली यामध्ये 72 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 2.36 टक्के एवढा राहिलेला असून गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर दोन टक्के वर स्थिर आहे तो आणखी खाली येण्याची गरज आहे.
तपासण्यांचा वेग कमी, वाढही कमी
आरोग्य विभागाने लसीकरणाच्या मोहिमेला गती दिली असून लसीकरण जोरदारपणे सुरू असताना गेल्या आठवड्यापासून तपासण्यांच्या संख्येत घट झालेली आहे. त्यामुळे बाधित वाढ घटली असून तपासण्यांचा वेग कमी झाल्याने बागेत वाढीचा वेगही कमी झालेला असल्याने जिल्हावासियांना दिलासा लावलेला आहे. ऑक्टोबर महिन्यात संसर्गाचा खाली येणारा आलेख महिना किरीस असाच राहिला तर नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्याचे कोरोनामुक्तीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
19 लाख जणांनी घेतला पहिला डोस
जिल्ह्यात मध्यंतरी शासनाकडून लसीकरण मोहीम थंडावली होती. मात्र त्यानंतर गत महिन्यापासून लसीकरणाला मोठा वेग आला असून आजमिती पर्यंत जिल्ह्यातील एकूण 27 लाख 12 हजार 775 नागरिकांनी लस घेतलेली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 19 लाख 88 हजार 684 एवढी आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आठ लाख 14 हजार 91 एवढी दिलासादायक झालेली आहे.
तिसऱ्या लाटेचा धोका टळला
राज्यभरच नव्हे तर जिल्ह्यात संसर्ग आटोक्यात आला असून गेल्या काही महिन्यात सातत्याने तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सद्यस्थिती पाहता राज्यात जिल्ह्यात देखील तिसऱ्या लाटेची शक्यता जवळपास मावळली आहे. मात्र तरीदेखील प्रशासनाकडून नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याबाबत अद्यापही आवाहन केले जात आहे.
शनिवारी जिल्ह्यात
तपासणी-2936
बाधित-47
मृत-2
मुक्त-28
उपचारार्थ -1,389
शनिवापर्यंत जिल्ह्यात
तपासणी-21,80,479
बाधित- 2,50,545
मुक्त-2,41,913
मृत-6,386









