प्रतिनिधी / शिरोळ
शनिवार व रविवार असे दोन दिवसांमध्ये शिरोळ तालुक्यात १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे नांदणी शिरोळ कुरुंदवाड जयसिंगपूर व हेरवाड या गावातून शनिवार दि. ४ व रविवार दि. ५ या दोन दिवसात तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचा अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. दातार यांनी दिली.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव तालुक्यात हळूहळू वाढू लागला आहे. यांच्या संपर्कात आलेल्यांना अनेकांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी विनाकारण बाहेर पडू नये मास हॅन्ड ग्लोज वापरावे असे आवाहनही त्यांनी केले आहे .
Previous Articleसोलापूर शहरात तब्बल 106 कोरोना पॉझिटीव्ह, 4 जणांचा मृत्यू
Next Article जांभा चोरी प्रकरणी जेसीबी, डंपर जप्त








