अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 21 डिसेंबर 2021, सकाळी 11.00
● जिल्ह्यातील स्वॅब तपासणी 1990 जणांची
● पॉझिटिव्हीटी 0.60 वर
● मृत्युदर रोखला
● सर्व तालुक्यातील परिस्थिती शून्य गाठण्यासाठी प्रयत्नशील
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील नव्याने होणारी बाधित वाढ रोखण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आपल्या तालुक्यातील नव्याने बाधित वाढ शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यास यश येत असून सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढ ही 12 वर स्थिर आहे. तर काल दिवसभरात 1990 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले असून पॉझिटिव्हीटी 0.60 वर आली आहे.
मृत्युदर रोखण्यात यश
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यात यश आलेले आहे. कोरोनामुळे मृत्यु कोणाचा होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. त्यामुळे कोरोनामुळे कोणाचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. गेल्या वीस दिवसात एखादा मृत्यू झाला असून आतापर्यंत 6488 जणांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना मुक्त झालेले 2 लाख 44 हजार 806 जण झाले आहेत.
मंगळवारी
नमुने-1990
बाधित-12
मंगळवारपर्यंत
नमुने-23,12,297
बाधित-2,52,290
मृत्यू-6488
मुक्त;2,44,806









