ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखांहून अधिक नोंदवली गेली. मागील 24 तासात देशात 2 लाख 68 हजार 833 नवे बाधित आढळून आले. गुरुवारच्या तुलनेत हा आकडा 4631 ने जास्त आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात 1 लाख 22 हजार 684 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 16.66 टक्के आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 14 लाख 17 हजार 820 आहे. शुक्रवारी दिवसभरात 402 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 4 लाख 85 हजार 752 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
दरम्यान, भारतातील 27 राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून, एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या 6041 एवढी आहे.









