इन्फोसिसच्या समभागांची समाधानकारक कामगिरी
वृत्तसंस्था/ मुंबई
चालु आठवडय़ात अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे मुंबई शेअर बाजारात चढ-उताराचे वातावरण राहिले होते. परंतु अंतिम दोन दिवस त्यांच्यातील तणाव निवळण्याच्या संकेतामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले होते. अंतिम सत्रात बीएसई सेन्सेक्स 147 अंकानी वधारुन बंद झाला आहे. तर दुसऱया बाजूला एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस यांच्या समभाग विक्रीमुळे बाजाराला तेजी गाठण्यास सोपे झाले.
दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स 323 अंकानी कार्यरत राहिला होता. परंतु बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 147.37 अंकानी वधारुन निर्देशांक 41,599.72 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 40.90 टक्क्यांनी वाढून 12,256.80 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये इन्फोसिसचे समभाग 1.47 टक्क्यांनी सर्वाधिक तेजीत राहिले होते. ही सकारात्मक गोष्ट तिमाहीचे आकडेसादर होण्याअगोदर आल्याने कंपनीला दिलासा देणारी बाब झाली होती. सोबत अल्ट्राटेक सिमेंट, मारुती , कोटक बँक, एशियन पेन्ट्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीत राहिले होते. दुसऱया बाजूला आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, टायटन आणि भारती एअरटेल यांचे समभाग मात्र 1.11 टक्क्यांनी घसरले आहेत.
तिमाही आकडे-अर्थसंकल्प
येत्या काळात केंद्रीय अर्थसंकल्प आणि तिमाहीचे नफा कमाईचे आकडेवारी सादर होणार आहे. यामुळे यांचा अंदाज घेऊन गुंतवणूकदार नफा देणाऱया कंपन्यांचे समभाग निवडण्याची शक्यता शेअर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.







