प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात सलग दुसऱया दिवशी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी शिरगाव येथील 65 वर्षीय वृद्ध व साडवली येथील 42 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या 21 झाली आहे. सोमवारी एकही नवा रूग्ण आढळला नसल्याने बाधीतांची संख्या 484 इतकी कायम राहीली आहे. तर आणखी 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
रविवारी कोरोनामुळे भिले येथील महिला व कापडगाव येथील व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दुसऱयाच दिवशी सोमवारी रत्नागिरी शिरगाव येथील 65 वर्षीय पुरूष व संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील 42 वर्षीय महिलेचा जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. या दोघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास होत़ा
शिरगावमधील व्यक्तीला मधुमेह व किडनीचा आजार होत़ा गेल्या आठवडय़ात ते मुंबईहून शिरगाव येथील आपल्या मुलीकडे आले होत़े रत्नागिरीत डायलिसिसच्या उपचारासाठी ते रूग्णालयात गेले. मात्र त्यावेळी कोरोना चाचणी घेण्यास सांगण्यात आले होते.या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मुलगी जावई आणि नातू यांना कोरोन्टाईनमध्ये ठेवण्यात आले होत़े या वृद्धाचे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतानाच निधन झाले. संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील महिलेचाही मुंबई प्रवासाचा इतिहास होता.
9 जण कोरोनामुक्त
कारोनाची बाधा झालेले 9 रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आह़े यामध्ये रत्नागिरी समाजकल्याण भवन येथून 7 व कोवीड रूग्णालय 2 रूग्णांचा समावेश आह़े यामुळे जिल्हय़ातील कोरोनामुक्तांची संख्या आता 358 झाली असून बरे होण्याचे प्रमाण 73 टक्क्यांवर पोहचले आह़े जिल्हाभरातील आकडेवारीनुसार आता 106 कोरोनाग्रस्त उपचारात दाखल असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आह़े
नवा रूग्ण नाही
रविवार सायंकाळपासून आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गेल्या 24 तासात कोरोना अहवाल प्राप्त होऊ शकलेला नसल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी कोणत्याही नव्या रूग्णाची भर पडलेली नाही. एकूण रूग्ण संख्या 484 कायम असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रत्नागिरीत 4 नवी बाधीत क्षेत्र
कोरोनाचे रूग्ण आढळून आल्यामुळे रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट, ओसवालनगर, मौजे निरूळ रिंगिचीवाडी, गोळप मुसलमानवाडी आदी क्षेत्र कॉन्टेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत़ असे आदेश उपविभागिय अधिकारी व दंडाधिकारी यांनी दिले आहेत़
जिह्यातील कन्टेनमेंट झोनची संख्या 49 वरून 44 करण्यात आली आह़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 14 गावे, गुहागर 01, संगमेश्वरमध्ये 01, दापोली 06, खेड 08 लांजामध्ये 05, चिपळूणमध्ये 8 व राजापूरमधील एका गावाचा समावेश आह़े संस्थात्मक विलगीकरणात 43 संशयितांना ठेवण्यात आले आह़े यामध्ये जिल्हा रूग्णालय 21, समाजकल्याण 01, उपजिल्हा रूग्णालय कामथेत 1, कोवीड केअर सेंटर घरडा खडे 4, दापोली 16 आदींचा समावेश आह़े तर जिल्हाभरात होम कॉरन्टाईमध्ये एकूण 33 हजार 646 जणांना ठेवण्यात आले आह़े
399 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 8 हजार 384 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 985 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 484 अहवाल पॉझिटीव्ह असून 7 हजार 486 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अद्याप 399 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित असून त्यात 4 कोल्हापूर, 162 मिरज तर 233 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.









