प्रतिनिधी/ महाबळेश्वर
दि 05-08 महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून कोसळणाया धुवाधार पावसाने आपले शतक पार केले असून गेल्या चोवीस तासात बारा इंच पावसाची नोंद झाली आहे महाबळेश्वर – पांचगणी मुख्य रस्ता वेण्णालेक नजीक पाण्याखाली गेल्याने वाहतूक मंदावली या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दैना उडाली लिंगमळा परिसर देखील जलमय झाला होता.
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून संततधार पावसाने महाबळेश्वर पांचगणी मुख्यरस्ता हा वेण्णालेक नजीक सुमनराज परिसरात पाण्याखाली गेला यामुळे वाहतूक काहीकाळ मंदावली मंगळवारी रात्रभर धुवाधार पाऊस कोसळत होता मात्र शहरात कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही वेण्णालेक रास्ता तसेच लिंगमळा परिसराची पाहणी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली व या परिसरातील नागरिकांशी चर्चा केली ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीपासूनच धुवाधार बॅटिंग सुरु केली असून संततधार पावसाने जनजीवन मात्र विस्खळीत झाले आहे मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट असल्याचे पाहावयास मिळाला.