सेन्सेक्स 605.64 तर निफ्टी 172.45 अंकांनी वधारले
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशीही बुधवारी शेअर बाजारातील तेजीचा प्रवास कायम राहिला आहे. सकाळी बाजार सुरु होताना बीएसई सेन्सेक्स 196.52 अंकांनी तर निफ्टी 27.70 अंकांच्या तेजीसोबत प्रारंभ झाला होता. परंतु दिवसअखेर सेन्सेक्स 605.64 अंकांनी वधारुन निर्देशांक 32,720.16 वर बंद झाला आहे तर दुसऱया बाजुला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 172.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 9,553.35 वर बंद झाला. या अगोदरच्या दिवशी मंगळवारीही सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजीचे वातावरण राहिले होते.
दिग्गज क्षेत्रांमध्ये बुधवारी वाहन क्षेत्रातील समभाग तेजीत राहिल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने मदरसन सुमी सिस्टम 8.70, अशोक लेलँड 6.18, बालकृष्ण इंडस्ट्रीज 424, एक्साइड इंडिया 4.07, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 3.89, हिरोमोटो कॉर्प 3.14, टीव्हीएस मोटर्स 2.58 आणि बजाज ऑटो 2.18 टक्क्मयांनी यांचे समभाग वधारले होते.
आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील कामगिरीवर लक्ष टाकल्यास अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाले आहेत. अमेरिकेच्या बाजारात डाउ जोंस 0.13 टक्क्यांनी घसरुन 24,101.60 वर बंद झाला आहे. अन्य शेअर बाजारात चीनच्या शांघाय कम्पोजिटमध्ये वाढ होत बंद झाला आहे तर फ्रान्स, इटली आणि जर्मनीतील बाजारही वधारत बंद झाले आहेत.
कोरोनाची धास्ती कायम
कोरोनाचा विळखा जगासोबत देशातही वाढत आहे. यामुळे विविध प्रकारच्या आर्थिक घडामोडी ठप्प आहेत. यामुळे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक दबावातच करत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. या काळात सरकार विविध प्रकारे आर्थिक मदतीद्वारे उद्योगव्यवसायांना हातभार लावत आहे. वेगवेगळय़ा योजना सुरु करुन उद्योग व्यवसाय काहीशा प्रमाणात सुरु करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. परिणामस्वरूप सध्या शेअर बाजारात समभाग विक्री करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.









