बेंगळूर/प्रतिनिधी
नव्याने बांधलेल्या तिसर्या टर्मिनल सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल (बायपनहळ्ळी) ची पाहणी शनिवारी रेल्वे बोर्डचे सदस्य आणि वित्त व भारत सरकारचे माजी सचिव नरेश सालेचा यांनी केली. त्यानंतर त्यांनी बेंगळूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात पत्रकारांशी चर्चा केली. नरेश सालेचा यांनी नवीन सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलचे लवकरच उद्घाटन होईल, अशी माहिती दिली. पत्रकारांनी उद्घाटनाच्या तारखेबाबत विचारले असता ते म्हणाले की तारीख अद्याप निश्चित केलेली नाही परंतु लवकरच उद्घाटन केले जाईल. हे टर्मिनल सर्व आधुनिक सुविधा, वातानुकूलन यंत्रणा आणि हरितगृह विकसित केले गेले आहे. टर्मिनलमध्ये उपलब्ध असलेले लाऊंज, रेस्ट रूम व इतर सुविधा विमानतळावर असल्याचा प्रवाशांना अनुभव येईल.
सलेचा म्हणाले की, सप्टेंबर २०२० पासून दरमहा मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. देशातील अत्याधुनिक सुविधा असणार्या रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी रेल्वे पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीवर लक्ष केंद्रित करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.









