प्रतिनिधी / शिरोळ
शासनाकडून माझे कुटुंब व माझी जबाबदारी अंतर्गत 15 सप्टेंबर पासून 25 ऑक्टोंबर पर्यंत प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करून आरोग्यशिक्षण द्यावयाची मोहीम सुरू केली आहे. मात्र आरोग्य तपासणी मोहिम जाहीर होऊनही सर्वेक्षणाचे साहित्य उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे सर्वेक्षणाचे साहित्य उपलब्ध झाल्यावरच काम करू अशी भूमिका शिरोळ भागातील आशा वर्कस महिलांनी घेतली आहे.
दरम्यान, आशा वर्कर्स युनियनच्या वतीने घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयातील आशा वर्करच्या वतीने आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. दातार यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याबाबत आशा वर्कर्स युनियनच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील म्हणाल्या, घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शिरोळ गाव व शिरोळ उपकेंद्राअंतर्गत आशा वर्कर्स काम करतात, शासनाच्यावतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणासाठी लागणारे साहित्य अद्याप उपलब्ध झालेले नाहीत, यामध्ये ऑक्सिपल्स मिटर, थर्मल स्क्रीनिंग उपकरण, स्टिकर्स, प्रसिद्धीपत्रक रजिस्टर, फॉर्मेट, टी शर्ट अन्य साहित्य तसेच तीन लोकांचे टीम याचे नियोजन करून देणे आवश्यक आहे,
शासनाकडून हे सर्व साहित्य अद्यापही उपलब्ध झालेले नाही, कोणतीही साधने आमच्या हातात नाहीत , त्यामुळे साहित्य उपलब्ध झाल्याशिवाय सर्वेक्षण करणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. मात्र आशा वर्कर्स यांचे दैनंदिनी काम सुरूच आहे ,
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









