साहित्यिक गुणवंत पाटील यांचे मत : बाग परिवारातर्फे शहीद भगतसिंग सभागृहात काव्यवाचन कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी साहित्याचा अभ्यास करताना केवळ कवितेमध्येच न रमता चारोळय़ा, गझल, ललित लेखन, कथा, अशा सर्व साहित्य प्रकारांचा अभ्यास करणे आणि तो वारसा समजून घेणे आवश्यक आहे, असे मत साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले.
बाग परिवारातर्फे शहीद भगतसिंग सभागृहात आयोजित काव्यवाचन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. व्यासपीठावर कवी संदीप मुतगेकर उपस्थित होते. कविता करण्याचा तुमचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. मराठी भाषेच्या वाढीसाठी साहित्य चळवळ आवश्यक आहे. पुढच्या पिढीपर्यंत साहित्याचा वारसा पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
प्रारंभी संदीप यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर स्मिता पाटील, भरत गावडे, परशराम कामती, कवयित्री धनश्री मुचंडी, कवी अशोक सुतार, डॉ. मेघा भंडारी, विश्वनाथ मुरगोडी, कवयित्री अपर्णा पाटील, रोशनी हुंदरे, निकिता भडकुंबे, आनंद मेणशी, मनीषा मोरे, अश्वजीत चौधरी, आरती पाटील, शीतल पाटील, अक्षता यळ्ळूरकर, माधुरी माळी, प्रा. मनीषा नाडगौडा, संदीप मुतगेकर, विनायक मोरे, निलेश खराडे, अर्जुन सांगावकर, अमोल पवार, मुक्ता पाटील, आरती कामती आदींसह काव्यरसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रा. मनीषा नाडगौडा यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ मुरगोडी यांनी प्रास्ताविक केले. संदीप मुतगेकर यांनी आभार मानले.









