- पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली
ऑनलाईन टीम / पुणे :
विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, व्यावसायिक, बेरोजगार अशा सर्वच समाज घटकांची घोर निराशा करणारा महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्प आहे.
या अर्थसंकल्पाने पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. भाजप सरकारच्या सत्ता काळात पुणे मेट्रो, बस खरेदी, भामा आसखेड पाणी पुरवठा, पीएमआरडीए, एचसीएमटीआर, जिल्हा उपरुग्णालय, ट्रान्सपोर्ट हब, पोलिसांसाठी गृहनिर्माण, एस टी स्थानक पुनर्निर्माण आदी विकासकामांना चालना देण्यात आली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने कोणतीही भरीव तरतूद न करता पुण्याच्या विकासाला खिळ घातली आहे.
कोणत्याही नवीन योजना नाहीत, पायाभूत सुविधांसाठी निधीची उपलब्धता नाही, कोविडमुळे आर्थिक स्थिती बिकट झालेले व्यावसायिक, छोटे व्यापारी, उद्योजक, कामगार, बारा बलुतेदार यांना कोणताही दिलासा नाही. पेट्रोल, डिझेल या इंधनावर असलेल्या राज्य सरकारच्या भरमसाठ करामध्ये सवलत नाही. त्यामुळे सर्वच समाज घटकांचे जीवन अधिक कठीण करणारा हा अर्थसंकल्प आहे.








