प्रतिनिधी / बेळगाव :
सरकारने विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केवळ पियुसी पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांनाच लॅपटॉप दिले आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. तेंव्हा सर्वच विद्यार्थ्यांना लॅपटॉप द्यावेत या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
सरकारने यावषी सरकारी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या तीन वर्षांपासून हे आश्वासने दिली जात आहेत. मात्र अद्याप विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिली गेली नाहीत. सध्या बेळगाव येथील केवळ 120 विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिली गेली आहेत. मात्र पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना दिली गेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. तेंव्हा तातडीने लॅपटॉप द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सचिन हिरेमठ, सुरेश जंगोणी, पार्वती नावलगट्टी, रविना आसुदे, ए. बी. हुडेद, ज्योती बोम्मन्नावर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.