ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटात सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज देशाला संबोधित केले. त्यावेळी मोदी म्हणाले, भारताची संकल्पशक्ती भारताला आत्मनिर्भर बनवू शकते. आपण सर्वोत्तम ते सर्व निर्माण करू शकतो. जीवन आणि मृत्यूच्या लढाईत भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर भारत हेच आपले उद्दिष्ट आहे. त्यासाठी आत्मनिर्भर अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. देशाची भरभराट करणाऱ्या उद्योगांना चालना देण्यासाठी या अभियानांतर्गत 20 लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे. ही रक्कम जीडीपीच्या 10 टक्के असणार आहे. या पॅकेजचा फायदा शेतकरी, मध्यमवर्गीय ,लघुउद्योग, कुटीरउद्योग एमएसईबी यासारख्या उद्योगांना होईल.
कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. जगात 42 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आपल्याला हार माणून चालणार नाही. कोरोना भारतासाठी एक संधी घेऊन आला आहे.
आपल्याला कोरोनापासून वाचायचं आहे आणि पुढे जायचे आहे, असेेेही मोदी म्हणाले.
मोदींकडून 4.0 लॉकडाऊनची घोषणा
पंतप्रधान मोदींनी आज चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशातील 4.0 था लॉकडाऊन पुर्णपणे नव्या स्वरूपात असणार आहे. चौथ्या लॉकडाऊनसाठी सर्व राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याचा अभ्यास करून चौथ्या लॉकडाऊनमध्ये बदल करण्यात येणार आहे.18 मे पूर्वी त्याचे नियम देशवासियांना कळविण्यात येतील, असेही मोदींनी सांगितले.









