आजच्याअर्जस्वीकारण्याच्याअंतिमवेळेतहीबदल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
ग्रामपंचायत निवडणुकीचे ऑनलाईन अर्ज भरताना सध्या उमेदवारांना समस्यांचा सामना करावा लागला. सर्व्हर डाऊन किंवा वेबसाईट स्लो चालत असल्याने उमेदवारी अर्ज भरताना अनेक अडचणी ग्रामपंचायत उमेदवारांसमोर मंगळवारी जिल्हाभरात उभ्या राहिल्या होत्या. केवळ एक दिवस बाकी असताना इच्छुक उमेदवार व राजकीय नेतेमंडळीही बुचकळय़ात पडली होती. पण सायंकाळी निवडणूक आयोगाने उमेदवारांचे अर्ज ‘ऑफलाईन’ घेण्यास परवानगी व बुधवारी दुपारी 3ची अंतिम वेळ सायंकाळी 5.30 पर्यंत वाढवून दिल्याने साऱयांनाच दिलासा मिळाला आहे.
जिह्यात 479 ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यासाठी सध्या सर्वत्र फॉर्म भरण्याची लगबग दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज बुधवार 30 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. पण मंगळवारी सकाळी 8 पासून उमेदवार सायबर पॅफेत बसलेले होते. दुपारी 2 वाजले तरी एकही अर्ज भरून झालेला नव्हता. यादिवशी सायंकाळपर्यंत ही समस्या कायम राहिली होती. अनेक उमेदवार सायबर कॅफे, महा ई-सेवा केंद्रात ठाण मांडून राहिले होते.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. ऑनलाईनमुळे विविध कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुक उमेदवारांची दमछाक झाली. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे सादर करण्यापर्यंत इच्छुक उमेदवारांची ओढाताण झाली. त्यामुळे इकडून-तिकडे धावपळ करताना साऱयांचीच डोकेदुखी वाढली. सर्वत्र उमेदवारी अर्ज भरण्याची झुंबड उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सांगण्यात आले. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे.
या तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांना तासन्तास सायबर कॅफे व महा ई-सेवा केंद्रात ताटकळत रहावे लागत आहे. सोमवारी रात्रीनंतर तर अनेक सायबर कॅफे चालक व महा ई-सेवा केंद्र चालकांना मंगळवारी पहाटेपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी थांबावे लागले. ऑनलाईन साईटच्या संथगतीमुळे रात्री नंतर पहाटेपर्यंत 2 ते 3 अर्जच भरून घेण्याची वेळ निर्माण झाली होती. त्यामुळे इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांमध्ये संताप पसरला आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर गर्दी होत आहे.
उमेदवार व त्यांचे समर्थक एकाचवेळी ऑनलाईन केंद्रावर आल्याने ही गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व्हर डाऊन व बेबसाईटची संथगती पाहता अर्ज भरण्याची तारीख वाढवून द्या, अशी मागणी इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांच्या नेतेमंडळीकडून प्रशासनाकडे करण्यात येत होती. शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांनी त्या बाबत प्रशासनाकडे मागणी करण्याचे पाऊल उचलले होते. दरम्यान सायंकाळी प्रशासन स्तरावरून निवडणूकआयोगाकडे झालेल्या पाठपुराव्यामुळे इच्छुक उमेदवारांसमोरील निर्माण झालेली अडचण दूर झाली आहे. बुधवारपर्यंत दिलेल्या 3 वाजेपर्यंतच्या अंतिम मुदतीतही वाढ करण्यात आली.
चौकट…..
ग्रा.पं. उमेदवारी अर्ज ऑफलाईन दाखल करता येणार
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. सोमवारी रात्रीपासून सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाहीत. मंगळवारी सकाळी 1 तास फक्त ही सुविधा चालू होती, मात्र त्यानंतर तांत्रिक अडचण उभी राहिली. या बाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी आल्या होत्या. सायंकाळी त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय घेत उमेदवारी अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी देण्यात आल्याचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सांगितले. शिवाय बुधवारी दुपारी 3 वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार होती. त्यात वाढ करून सायंकाळी 5.30 करण्यात आली आहे. ऑफलाईन भरण्यासाठीचे अर्ज माऊली झेरॉक्स जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.









