सोशल मिडियावरील व्हायरल संदेश निराधार : जिल्हा समन्वयक डॉ.सुभाष नांगरे
नंदकुमार तेली / कोल्हापूर
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व रेशन कार्ड धारकांना महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मोफत वैद्यकीय उपचारासंदर्भात शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला. सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे वैद्यकीय उपचारावर होणाऱ्या खर्चासाठी हातभार लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. याचा लाभ रुग्णांना ३१ डिसेंबरपर्यंत मिळणार आहे. सोशल मिडियावर काही दिवसांपासून महात्मा पुले जीवनदायी योजनेसंदर्भात होत असलेला व्हायरल संदेश निराधार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांनी दिली.
सहा महिन्यापूर्वीचा महत्वपूर्ण निर्णय
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सहा महिन्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात कोरोना संसर्गाचा फैलावामुळे रुग्णसंख्येत लक्षणिय वाढ झाली. यामुळे शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयानुसार कोरोनाच्या सर्व रेशन कार्डधारक रुग्णांना महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने दिली होती.
सर्व रेशन कार्डधारकांना रुग्णांना विनामूल्य औषधोपचार
कोरोना महामारीच्या काळात गरीब व सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय खर्च आवाक्याबाहेर गेला होता. यासाठी राज्य शासनाने इन्शुरन्स कंपनीकडे नागरिकांच्या आरोग्याचा १५०० कोटींचा विमा उतरला. यामुळे महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत आजारातील रुग्णांना विनामूल्य औषधोपचार करून घेणे शक्य झाले. यासाठी शासकीय योजनेंतर्गत शासनाने रुग्णालयांची यादी प्रसिध्द केली होती. तसेच योजनेत नसलेल्या हॉस्पिटल्सना ६ महिन्यांसाठी शासकीय योजनेंतर्गत कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचार करण्याविषयी सवलत देण्यात आली होते. त्यामुळे योजनेत नसलेल्या रुग्णालयांनाही कोरोना रुग्णांवर योजनेत उपचार करता येणे शक्य झाले आहे.
सोशल मिडियावरील व्हायरल संदेश निराधार : जिल्हा समन्वयक डॉ.सुभाष नांगरे
गेल्या सहा महिन्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने महात्मा फुले जीवनदायी योजनेतून सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत उपचारासंदर्भात महत्वूपर्ण निर्णय घेतला होता. याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत असून नविन कोणतेही निर्देश शासनाकडून उपलब्ध झालेले नाहीत. काही दिवसांपासून सोशल मिडियावरील आता सर्वांना मोठा दिलासा, महात्मा फले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ठ, कोल्हापूर जिल्हयातील 44 दवाखान्यांचा समावेश, सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आदींसह विविध माहिती देणारा संदेश सहा महिन्यापूर्वीचाच आहे. या संदेशामधून कोणतीही नाविन्यपूर्ण माहिती देण्यात आलेली नसून निराधार असल्याचे नाविन्यपूर्ण अशी कोणतीही माहिती नसल्याचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांनी दिली.









