प्रतिनिधी / वारणा कापशी
आपलं छोटसं घर असावं अशी प्रत्येकाची भावना असते. तसेच प्रत्येकाचं स्वप्न असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करत असतो. यातच देशात कोरोना संसर्ग वाढला आणि संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. या काळामध्ये सर्व व्यवसाय ठप्प झाले. तोटा भरून काढण्यासाठी काही व्यावसायिकांनी आपल्या उत्पादनांचे दर वाढवले. मजूर कमी प्रमाणात मिळू लागले. त्यामुळे बांधकाम व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या सर्व मालाच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्याच्या घर बांधण्याच्या स्वप्नाला महागाईचा दणका बसला.
घर बांधकामासाठी लागणारे वाळू, विटा, सिमेंट, स्टील, यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. बांधकाम मजूर तर आपल्या राज्यात गेले ते काही परत आलेच नाहीत. वीट बनवण्यासाठी लागणारे कुशल कामगार सुद्धा मिळत नसल्यामुळे या व्यवसायांवर परिणाम झालेला आहे. वाळु तर मिळेनाशी झाली आहे. वीट तयार करण्यापासून बांधकामासाठी लागणारे मजूर मिळत नसल्याने त्याचा फटका ठेकेदारासह सर्वसामान्य माणसांना बसत आहे.
Previous Articleसोशल मीडियाच्या क्रांतीत मराठी भाषेचाच झेंडा!
Next Article अमेरिकेचे सौदी अरेबियाविरोधात कठोर पाऊल









