बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे नोकऱया नाहीत. व्यवसाय नाही. त्यामुळे पालकवर्ग अडचणीत आला आहे. असे असताना शाळा चालक फी भरण्यासाठी तगादा लावत आहेत. वेळेत फी नाही भरली म्हणून दंडही आकारला जात आहे. त्यामुळे पालकवर्ग अडचणीत आला आहे. महत्त्वाचे म्हणजे शाळा अजून सुरू नसतानाही फी घेणे चुकीचे आहे. तेंव्हा सर्वच शाळांनी संपूर्ण फी माफ करावी, अशी मागणी बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मागील वर्षापेक्षाही यावषी अधिक फी आकारण्यात येत आहे. पालकांनी तक्रार केली तर त्यांच्या मुलांवर दबाव आणण्यात येत आहे. त्यामुळे पालकवर्ग तक्रार करण्यास पुढे येत नाही. तेंव्हा या फीबाबतची चौकशी करून फी माफ करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कोरोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने अनेक पालकांनी सोसायटी तसेच खासगी सावकारांकडूनही पैसे घेतले आहेत. त्यामुळे पालकवर्ग अडचणीत आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दडपण येण्याची शक्मयता आहे. तेंव्हा तातडीने याचा विचार व्हावा व सर्वच शाळांनी फी माफ करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली
आहे.
अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. एन. आर. लातूर, ऍड. आण्णासाहेब घोरफडे, ऍड. लंकेश हेग्गण्णावर, ऍड. यशवंत लमाणी, ऍड. एम. बी. बोंदे, ऍड. एस. एल. त्यापी यांच्यासह वकील उपस्थित होते.









