प्रतिनिधी/ बेळगाव
अलारवाडजवळील शेतवडीत काम करताना सर्पदंश होऊन नवी गल्ली, शहापूर येथील एका शेतकऱयाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. ऐन दसरोत्सवात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीनिवास भाऊराव गुंडाण्णाचे (वय 52) असे त्या दुर्दैवी शेतकऱयाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, बहीण असा परिवार आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती. उपलब्ध माहितीनुसार शनिवारी सायंकाळी श्रीनिवास हे शेतवडीत गेले होते. सायंकाळी शेतात काम करताना त्यांना सर्पदंश झाल्यामुळे 108 रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.









